आधी तुमचा व्यवसाय समजून घेऊ
रोज हे काम करणाऱ्या तुमच्या टीमच्या सूचना आम्हाला महत्त्वाच्या आहेत.
i26 बद्दल
मी वैभव भोसले. सोलापूर, महाराष्ट्र येथून i26.in या नावाने वेबसाइट आणि सॉफ्टवेअरचे काम स्वतंत्रपणे करतो.

आमचा दृष्टिकोन
ग्राहकाला तुमचे काम समजले पाहिजे आणि तुमच्याशी संपर्क करता आला पाहिजे. तुम्हालाही आलेल्या चौकशींची नोंद ठेवता आली पाहिजे. वेबसाइट तयार करताना आम्ही याच गोष्टींना प्राधान्य देतो.
काय तयार करायचे ते तुमच्यासोबत ठरवतो. काम होत असताना तुम्हाला दाखवतो. वेबसाइट सुरू झाल्यावर ती कशी वापरायची हेही समजावतो.
आमची तत्त्वे
रोज हे काम करणाऱ्या तुमच्या टीमच्या सूचना आम्हाला महत्त्वाच्या आहेत.
तुमच्याकडची साधने उपयोगी असतील तर ती वापरू. गरज असेल तिथेच नवीन सॉफ्टवेअर बनवू.
काम कुठपर्यंत आले आहे ते दाखवू. बदल किंवा अडचण असेल तर वेळेवर सांगू.
काय तुमच्या ताब्यात येईल, ते कसे वापरायचे आणि पुढे मदत कशी मिळेल, हे आधीच ठरवू.
संस्थापक
मी सोलापूरहून i26.in चे काम स्वतंत्रपणे करतो. तुमची गरज, खर्च आणि वेळ याबद्दल माझ्याशी थेट बोलू शकता. कामाची पद्धत आणि जबाबदाऱ्यांची माहिती सेवा अटींमध्ये दिली आहे.
vaibhav@i26.in